Lyrics - Hindi Movie Songs
 Marathi Song Index | Movie | Singer | Musician | Lyricist | Play | Forum | Suggest a Song | Email this Page | Guestbook | Hindi
Singer :Usha Mangeshkar
Music Director :Yeshwant Deo

गायक :उषा मंगेशकर
संगीतकार :यशवंत देव



वेळ झाली भर माध्यान्ही, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतीच्या फुला

तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी
कसातरी जीव धरी, माझ्या प्रीतीच्या फुला

वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनू ते
चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतीच्या फुला

माझी छाया माझ्या खाली, तुज साठी आसावली
कशी करु तुज सावली, माझ्या प्रीतीच्या फुला

दाटे दोन्ही डोळा पाणी, आटे नयनांत सुकूनी
कसे घालू तुज आणूनी, माझ्या प्रीतीच्या फुला

मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला
Lyrics Home | Hindi Lyrics | Marathi Lyrics | Lyrics Forum
copyright © 2000-2006 Manjusha Umesh