|
पहा टाकले पुसूनी डोळे, गिळला मी हुंदका
रणांगणी जा सुखे राजसा, परतून पाहू नका
झडे दुंदूभी, झडे चौघडा, रण रंगाचा हर्ष केवढा
एकदाच जन्मात लाभते ही असली घटीका
शकुनगांठ पदरास बांधुनी, निरोप देते तुम्हा हसुनी
आणि लावते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका
या देशाची पवित्र माती, इथे वीरवर जन्मां येती
तोच वारसा तुम्ही पोचवा, येणार्या शतका | |