Lyrics - Hindi Movie Songs
 Marathi Song Index | Movie | Singer | Musician | Lyricist | Play | Forum | Suggest a Song | Email this Page | Guestbook | Hindi
Lyricist :P.Savlaram
Singer :Lata Mangeshkar

गीतकार :पी. सावळाराम
गायक :लता मंगेशकर



श्रीरामा घनश्यामा, बघशील कधी तू रे
तुझी लवांकुश बाळे

वनवासाच्या घरात माझ्या, अरुणचंद्र हे सवे जन्मता
विरह प्रीतीचे दुःख ही माझे हसले रघुनाथा
विश्वाची मी मंगलमाता, तुझी लाडकी सीता
तुझ्या विना रे आनंदाला गालबोट लागले

रुप मनोहर तुझे पाहीले, यौवनातली कांती
बाळांच्या या रुपे बघते तुझ्याच चिमण्यामूर्ती
पूर्ण पाहीले तुला राघवा, परी ही दैवगती
तुझे बालपण तुझ्यापरी का वनवासी झाले

बघायचे नसेल मजला, ये ना बाळांसाठी
चार करांचा कोमल विळखा, पडू दे शामल कंठी
ताटातूटीच्या भेटी घडता, झरझर अमृत ओठी
मिटूनी डोळे म्हणेन माझे रामायण संपले
Lyrics Home | Hindi Lyrics | Marathi Lyrics | Lyrics Forum
copyright © 2000-2006 Manjusha Umesh