|
माझिया नयनांच्या कोंदणी, उमलते शुक्राची चांदणी
तम विरते, रात्र सरते, पहाट वारे झुळझुळते
प्राजक्ताचे तरु मोहरते, हृदयीच्या अंगणी
प्रहर पहिला अविरत येतो, भूपाळीचे स्वर गुणगुणतो
अरुण मनाचा हर्ष रंगतो, पूर्वेच्या लोचनी
दव बिंबातूनी क्षण सोन्याचा, उजळत राही जीव जीवाचा
स्वर्ग हासतो वसुंधरेच्या किरणां किरणांतूनी | |