|
उद्धवा, अजब तुझे सरकार
लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार
इथे फुलांना मरण जन्मता, दगडाला पण चिरंजिवीता
बोरी बाभळी उगाच जगती, चंद्र माथी कुठार
लबाड जोडी इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार
वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर, ना माणसास आधार | |