|
संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही
नदी नव्हे ही निसर्गनीती, आत्मगतीने सदा वाहती
लाभ हानीची लव ही कल्पना, नाही तिज ठायी
कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूज्य देवता
पाषाणाची घडवून मूर्ती, पूजित कुणी राही
सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवूनी नेई रानी
आळशास ही व्हावी कैसी गंगा फलदायी | |