|
नसे राऊळी वा नसे मंदीरी
जिथे राबती हात तेथे हरी
जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम
तिथे अन्न होऊन ठाकेल शाम
दिसे सावळे रुप त्याचे शिवारी
नको मंत्र त्याला मुनी ब्राम्हणांचे
तया आवडे गीत श्वासा घणांचे
वसे तो सदा स्वेद गंगे किनारी
शिळा फोडीती संघ पाथरवटांचे
कुणी कापसा रुप देती पटांचे
तयांच्या घरी नांदतो तो मुरारी
जिथे काम तेथे उभा श्याम आहे
नव्हे धर्म रे घर्म ते रुप पाहे
असे विश्वकर्मा श्रमाचा पुजारी | |