|
भगवंताची करणी, सारी भगवंताची करणी
अधांतरी हे झुले नभांगण, शेषफणावर धरणी
लक्ष्मीसाठी घर गर्वाचे उंच बांधूनी देतो
गरीबासाठी गरीब होऊन झोपडीतही रमतो
पतितासंगे पतितपावन चालतसे अनवाणी
समुद्रात जरी अथांग पाणी, तहान शमवी श्रावणधार
अन्न ब्रम्ह ते अखंड घेते, काळ्या मातीतून अवतार
जगण्यासाठी तरी मानवा लाग प्रभूच्या चरणी
जिथे वाजतो घुंगूरवाळा, बालक होऊन तिथे रांगतो
मायबाप तो सवर् जगाचा, आईसाठी जगात येतो
हात जोडूनी देव बोलतो, शरण तुला गे जननी | |