|
प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला
प्रीतीच्या या पाखराचे रत्नकांचनी पंख देऊ का
देऊ तुला का हर्ष गंध हा, जीव फुलातून मोहरलेला
या हृदयीच्या जलवंतीची, निळी ओढ ती तुला हवी का
रुप मोहिनी लावण्याची, हवी तुझ्या का चंद्रकलेला
मोहक सुंदर जे जे दिसते, तूच तयांचा जन्मदाता
घेशील का रे माझ्याकरीता, अधरीच्या या अमृताला | |