तुजसाठी शंकरा, भिल्लीण मी झाले, धुंडीत तुज आले अंजन चर्चून चंद्रमुखाला, शामल सुंदर बनले मृगाजीनाची कंचुकी घालून, प्रतिबिंबाला हसले नयना मधल्या जलगंगेला, दुःख प्रीतीचे कसले नव्हते गंगा ब्रम्ह कधी का, मायेवरती रुसले