|
मुकुंदा रुसू नको इतुका
विनविते तुझी तुला राधिका
तुझ्या मुरलीला आतुरलेली
गवळ्याची मी गौळण भोळी
तू माझा मी तुझी सावली
नको रे राग धरु लटका
खिन्न होऊनी तुझिया साठी
नाच थांबला यमुनाकाठी
गोपीनाथ तू, तुझ्या भोवती
जमल्या सार्या या गोपिका
पुन्हा एकदा पहा विचारुनी
तुझे तुला तू मनापासूनी
तू नाहीतर तुझ्यावाचूनी
मंजूळ नाद येईल का ? | |