|
पाहूनी रघुनंदन सावळा
लाजली सीता स्वयंवराला
नक्षीदार अती रम्य मंडपी
जमली सारी थोर मंडळी
उभी जानकी जनका जवळी
घेऊनी धवल फुलांची माला
धनुष्यास त्या दोर लावण्या
शूर पुरुष तो कुणी धजेना
काय करावे काही सुचेना
न्याहळी दूरुनी श्रीरामाला
मुनीवरांना मान देऊनी
उठले रघुवर असे पाहूनी
मनासारखे येता जुळूनी
नाचते हर्षभराने मिथिला | |