|
मानसकन्या कण्वमुनीची, बसूनी वनी एकांती
गुंफिते माळ बकुळ फुलांची
शारद नयनी उमलत होता, अनुरागाचा रम्य नीलिमा
अरुण कपोली गोड लालिमा, फुलवित लाज तियेची
यौवन सौरभ पुसतो तिजला, कोण यायचा सखे पाहुणा
नावाविणही घेत उखाणा, प्रीत तिच्या हृदयाची
आठवणीची करीता मृगया, हसते खुदुखुदु मनी आतुरता
सखया येता मंगल घटीका आली स्वयंवराची | |