|
घनतमी शुप् बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी
ये बाहेरी अंडे फोडूनी
शुद्ध मोकळया वातावरणी
का गुदमरसी आतच कुढूनी
रे मार भरारी जरा वरी
फुल गळे, फळ गोड जाहले
बीज नूरे, डौलात तरु डूले
तेल जळे बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी ?
मना वृथा का भिसी मरणा
दार सुखाचे ते हरी करुणा
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहू कवळण्या उरी | |