|
प्रतिमा उरी धरुनी, मी प्रीती गावे
ते गीत प्रीतीचे रे, हळूवार मी म्हणावे
अस्फुट भावनांच्या स्वप्नांत गुंग व्हावे
पुष्पात गंध जैसा, गीतात भाव तैसा
अद्वैत प्रीतीचे हे, मम जीवनी असावे
तू सप्तरंग धनूचे, स्वर सात बासरीचे
संगित जीवनाचे, आळवीत मी बसावे
का रोहीणीस वाटे, चंद्रासवे असावे
हे भावस्वप्न अपुरे साकार तू करावे | |