|
केशवा माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा
तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातूनी तारिसी मानवा
वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदा घरच्या गायी हाकीशी गोकुळी माधवा
वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकूनिया पांडवांचा पळिवसी कौरवा | |