रम्य ही स्वर्गाहूनी लंका हिच्या किर्तीचा सागर लहरी, नादविती डंका सुवर्णकमला परी ही नगरी फुलून दरवळे निळ्या सागरी त्या कमलावर चंद्र निजकरे, किरतो अभिषेका लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभय उपजल्या या जलधितूनी या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का ?