|
तुझ्या कांतिसम रक्तपताका, पूर्वदिशे फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, उठ महागणपती
सूर्याआधी दर्शन घ्यावे, तुझे मूषकध्वजा
शुभद सुमंगल सर्वांआधी, तुझी पाद्यपूजा
घेऊनी वीणा जागविते तुज सरस्वती भगवती
आवडती तुज म्हणूनी आणिली रक्तवर्ण कमळें
पाच मण्यांच्या किरणांसम हे हिरवी दुर्वादळें
उभ्या ठाकल्या चौदा विद्या घेऊनिया आरती
शूपकर्णका, उठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगाचा तूच नियंता, विश्र्वाची आसरा
तुझ्या दर्शना अधिर देवा, हर ब्रम्हा श्रीपती | |