|
तूच कर्ता आणि करविता
शरण तुला भगवंता, मी शरण तुला भगवंता
तुझिया श्वासे पान हलते, हर्षे तुझिया फुल फुलते
तेज झळाळत गगन ही झुलते, रविचंद्राचा तू निर्माता
सुखदुःखाची ऊनसाऊली, तुझीच जाणिव वेळोवेळी
तुझ्या कृपेच्या पंखाखाली, जीवदान ते मरणा मिळता
देऊळ तूची, तूच मूर्ती, तूच आरती, पूजा भक्ती
तूच असता माझी पूर्ती, मागायाचे काय, अनंता | |