|
बाळा होऊ कशी उतराई
तुझ्यामुळे मी झाले आई
तुझ्या मुखाचे चुंबन घेता
हृदयी भरते अमृत सरीता
तव संजीवन तुला पाजिता
संगम होता उगमा ठायी
गाई झुरु झुरु तुज अंगाई
माय भुकेला तो जगजेठी
तुझ्या स्वरुपी येऊन पोटी
मंत्र आई जपता ओठी
महान मंगल देवाहून मी
मातृ दैवत तुझेच होई | |