हसले गं बाई हसले
अन कायमची मी फसले
नयन कवडसा टाकूनी कुणी तर
दिपवी माझे लबाड डोळे
प्रीत मधाचे सुंदर पोळे
हृदयी शिरुनी चोरुन नेले
सांगायाची चोरी झाली
आई विचारी काय जहाले
चिडले रुसले माझ्यावर मी
मलाच होते हरवून बसले
पाळत ठेवून त्या लुच्च्याला
धरुनी बांधून खेचित नेले
वाजत गाजत कैदी केले
शासन करता घरास मुकले |