आज हृदय मम विशाल झाले त्यास पाहूनि गगन लाजले आज माझिया किरणकरांनी ओंजळीमधे धरली अवनी अरुणाचे मी गंध लाविले त्या विश्वाच्या कणाकणांतून भरुन राहिले अवघे मी पण फुलता फुलता बीज हरपले