|
दिवा पाहूनी लक्ष्मी येते, करु तिची प्रार्थना
शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा
शुभंकरोती कल्याणमं, शुभंकरोती कल्याणमं
जेथे ज्योती, तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशांदिशांतून या लक्ष्मीच्या, दिसती पाऊल खुणा
या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना
दिव्या दिव्या रे दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार
दिव्यास पाहून नमस्कार हा, रिवाज आहे जुना | |