|
नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज नाव रे
सांजवेळ झाली आता, पैल माझे गाव रे
आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलूनी गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे
नवा साज ल्यायिले मी गौरीवाणी सजले मी, चांदवा ल्याला
माझा जीव उरामंदी फुलूनी आला
नाचते रे बघ माझे तन, संग त्याचा भाव रे | |