|
कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे
कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे
बिज अंकुरे ज्या ठायी, तिथे तुझा वास
तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास
चराचरा रंगविशी, रंग तुझा कोणता रे
कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला
जनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला
तुझी खुण नाही ऐसा गाव तरी कोणता रे
खरे रुप देवा तुझे, कोणते कळेना
तूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा
तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे | |