|
मानवतेचे मंदिर माझे, आता लाविल्या ज्ञानज्योती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
बंधुत्वाची येथ सावली, अनाथ आमुचे मायमाऊली
कधी दिसे का ईश राऊळी, देव ते अंतरात नांदती
आम्ही लाडके विठूरायाचे, लेणे जरी ही दारिद्र्याचे
अभंग ओठी मानवतेचे, मृदुंगी वेदनेस विस्मृती
दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फडफडे
भावभक्तीचे आम्हा साकडे, पथिक हे परंपरा सांगती | |