|
या चिमण्यांनो, परत फिरा रे
घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या
दहा दिशांनी येईल आता, अंधाराला पूर
अशा अवेळी असू नका रे आई पासून दूर
चुकचूक करीते पाल उगाच, चिंता मज लागल्या
अवतीभवती असल्यावाचून कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हा, आमुच्या कधीही कामाचा
या बाळांनो या रे लवकर, वाटा अंधारल्या | |