|
मान वेळावूनी धूंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलू नको
ऐक माझे जरा, हट्ट नाही खरा
दृष्ट लागेल गं, दृष्ट लागेल गं
आज वारा बने रेशमाचा झूला
ही खुशीची हवा, साद घाली तुला
मोर सारे तुझे, हे पिसारे तुझे
रुप पाहून हे चंदर् भागेल गं
दृष्ट लागेल गं ...
पाहणे हे तुझे, चांदण्याची सुरी
हाय मी झेलली आज माझ्या उरी
लाट मोठी फुटे, शीड माझे कुठे
ही दिशा कोणती कोण सांगेल गं
दृष्ट लागेल गं ... | |