|
राजाच्या रंगम्हाली, सोन्याचा बाई पलंग
रुप्याचा खांब, तेला मोत्याची झालर
राजाच्या रंगमहाली, पराची मऊ गादी
जरीचा चांदवा, रेशमी शिणगार
गडनी, सजनी, गडनी सजनी गं
राजाच्या रंगम्हाली, रानी ती रुसली
बोलना, हसना, उदास नजर
राजाच्या रंगम्हाली, राजानं पुशिलं
डोळयाची कमळं उघडा, व्हठाची डाळिंबं
गडनी, सजनी, गडनी सजनी गं
राजाच्या रंगम्हाली, रानी वो सांगिते
सुना सोन्याईन म्हाल, कशाला बडीवार
मायेच्या पूतापायी, रानी गं रडीते
असवांची गंगा व्हाते, भिजीला पदोर
गडनी, सजनी, गडनी सजनी गं | |