|
या डोळयांची दोन पाखरे, फिरतील तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील, असा कुठे ही जगती
दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा
सहवासवीण नकोच यांना अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यास नभांगण, घरकुल तुमची छाती
सावलीत ही बसतील वेडी, प्रीतीच्या दडूनी
एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडूनी
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी, ही तर अक्षय नाती | |