Lyrics - Hindi Movie Songs
 Marathi Song Index | Movie | Singer | Musician | Lyricist | Play | Forum | Suggest a Song | Email this Page | Guestbook | Hindi
Lyricist :G. D. Madgulkar
Singer :Sudheer Phadke
Music Director :Sudheer Phadke

गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :सुधीर फडके
संगीतकार :सुधीर फडके



धूंद येथ मी स्वैर झोकितो मदयाचे प्याले
याचवेळी तू असशील तेथे बाळा पाजविले

येथे विजेचे दिवे फेकती उघडयावर पाप
ज्योत पणतीची असेल उजळीत तव मुख निष्पाप
माझ्या कानी घुमती गाणी मादक मायावी
ओठांवरती असेल तुझीया अमृतमय ओवी

माझ्यावरती खिळली येथे विषयाची दृष्टी
मत्पूजेस्तव असशील शोधित सखे स्वप्नसृष्टी
कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली
विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली

तुझे नि माझे अंतर व्हावे कसे एकरुप
शीलवती तू पतिव्रते, मी मूर्तीमंत पाप
Lyrics Home | Hindi Lyrics | Marathi Lyrics | Lyrics Forum
copyright © 2000-2006 Manjusha Umesh