|
काजलरातीनं ओढून नेला, सये साजन माझा
जीव ये भरुनी, भिजते पापणी, कधी रे येशील राजा ?
पाऊस येडापिसा जीवाला, लावून गेला ताप
तुफान आलं सुसाट, माझा करुन गेला घात
कातरयेळी करणी झाली, हरवून गेला राजा
सुकली फुलांची शेज राया, राहीला अर्धा डाव
उधळून जाता खेळ वाया, श्वासांनी सोडीला ठाव
भुकेली ज्वानी जळते आतूनी, ये रे ये एकदा राजा | |