|
जे वेड मजला लागले, तुजला ही ते लागेल का ?
माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का ?
मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी
जे मी मुकेपणी बोलतो, शब्दात ते रंगेल का ?
हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण जाहलो
जे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का ?
माझे मनोगत मी तुला, केले निवेदन आज हे
सर्वस्व मी तुज वाहीले, तुजला कधी उमजेल का ? | |