Lyrics - Hindi Movie Songs
 Marathi Song Index | Movie | Singer | Musician | Lyricist | Play | Forum | Suggest a Song | Email this Page | Guestbook | Hindi
Lyricist :G. D. Madgulkar
Singer :Asha Bhosle
Music Director :Dutta Davjekar

गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :आशा भोसले
संगीतकार :दत्ता डावजेकर



भारतीय नागरीकाचा घास रोज अडतो आओठी
सैनिक हो तुमच्या साठी, सैनिक हो तुमच्या साठी

वावरतो फिरतो आम्ही, नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो
परी आठव येता तुमचा, आतडे तुटतसे पोटी
सैनिक हो तुमच्या साठी ...

आराम विसरलो आम्ही, आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडून या इकडे, वार्तासह येतो वारा
ऐकताच का अश्रूंची, डोळयात होतसे दाटी
सैनिक हो तुमच्या साठी ...

उगवला दिवस मावळतो, अंधार दाटतो रात्री
माऊली नीज फिरिवते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्नात येऊनी चिंता काळजा दुखविते देठी
सैनिक हो तुमच्या साठी ...

रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या, प्राणांस घेऊनी हाती
तुमच्यासह अमुची लक्ष्मी, तुमच्यासह शेतीभाती
एकट्या शिपाया साठी, झुरतात अंतरे कोटी
सैनिक हो तुमच्या साठी ...
Lyrics Home | Hindi Lyrics | Marathi Lyrics | Lyrics Forum
copyright © 2000-2006 Manjusha Umesh