दिन तैसी रजनी झाली गे माये पडीले दूरदेशी, मज आठवे मानसी नको नको हा वियोग, कष्ट होताती जिवासी अवस्था लावोनी गेला अजून का न ये गरुडवाहना गुणगंभिरा, येईगा दातारा बाप रखुमादेवीवरा श्रीविठ्ठला