|
केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजली कवळी पाने, असूनी निगराणी
अशी कुठे लागली आग, जळती जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके वन सारे
किती दूरची लागे झळ, आतल्या जीवा
गाभ्यातील जीवनरस, सुकत ओलावा
किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघूनी भवताली | |