वाट इथे स्वप्नातील संपली जणू थांबवितो धारांनी सावळा घनू आजूबाजूच्या पानांनी वेढली ही निळाई चिंतनात बैसली ग मंत्रमुग्ध राई फुलुनिया आली गडे बावरी तनू दर्यांतूनी आनंदला, पाणओघ नाचरा आसमंत भारीतो गं गानसूर हासरा माथ्यावरी दिसले गं इंद्राचे धनू