जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरुनिया चालो वाटे आम्ही तुझाची आधार चालविसी भार सवे माझा बोलो जाता बरळ करीसी ते नीट नेली लाज, धीट केलो देवा तुका म्हणे आता खेळतो कौतूके जाले तुझे सुख अंतर्बाही