|
राधा कृष्णावरी भाळली, कुजबुज उठली गोकुळी
अमृतवृक्षे फुलला मोहोर, कोकीळकंठी फुटला सुस्वर
कुंजवानातून, फुलाफुलांतून, नवलकथा दरवळली
वायू वेगे सुगंध वार्ता, कालिंदीच्या कानी पडता
हरीभक्तीची ओढ तियेची, नीलजळी थयथयली
अमर प्रीतीचे गीत लाघवी, हरी अधरीची वेणू वाजवी
राधामोहन बघण्या मिलन, इंद्रपुरी अवतरली | |