Lyrics - Hindi Movie Songs
 Marathi Song Index | Movie | Singer | Musician | Lyricist | Play | Forum | Suggest a Song | Email this Page | Guestbook | Hindi




हवास तू, हवास तू
हवास मज तू, हवास तू
प्रिया नाचते आनंदाने, दूर उभा का उदास तू 

मदनासम हे रुप देखणे, शब्दावीण हे मुक्त बोलणे
तुझ्यापुढे मज गगन ठेंगणे, ज्योती मी अन प्रकाश तू
हवास मज तू, हवास तू

या तेजस्वी डोळ्यांमधली, भर दिवसा ही रात्र चांदणी
मुखचंद्राच्या कलाकलांनी, हासविणारा सुहास तू
हवास मज तू, हवास तू

तारुण्याच्या झाडावरती मोहक होऊनी बसली प्रीती
या प्रीतीच्या पूर्तीसाठी, करशील का रे प्रयास तू
हवास मज तू, हवास तू
Lyrics Home | Hindi Lyrics | Marathi Lyrics | Lyrics Forum
copyright © 2000-2006 Manjusha Umesh