|
हा महाल कसला, रानझाडी ही दाट
अंधार रातीचा कुठं दिसना वाट
कुण्या दवाडानं घातला घाव, केली कशी करणी
सख्या रे घायाळ मी हरीणी
काजळ काळी गर्द रात अन कंपकंप अंगात
सळसळणार्या पानांना, ही रातकिडयांची साथ
कुठे लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावूनी
गुपित उमटले चेहर्यावरती, भाव आगळे डोळ्यांत
पाश गुंतले नियतीचे तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी कशी पळू मी गेले मी हरवूनी | |