|
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
गहिवरला मेघ नभी, सोडला गं धीर
पापणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठांवरी भिजला गं आसावला सूर
गहिवरला मेघ नभी, सोडला गं धीर
भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातूनी कुणी आज भावगीत बोलले
डोळीयात पाहीले, कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या सूरासूरात थांबले
झाडावरी दिसला गं भारला चकोर
गहिवरला मेघ नभी, सोडला गं धीर | |