|
माझ्या कपाळीचं कुक्कू
कवतिकानं किती बाई निरखू
जीव भरंना, भरंना, भरंना
खरं वाटंना, वाटंना, वाटंना
कुण्या जल्मीची पावली पुण्याई
झाली परसन आई अंबाबाई
चिरी कुकवाची लखलख निरखू
जीव भरंना, भरंना ...
सुर्व्या सांजचा, चांद पूनवचा
सर्गाची गं सुभा, दारी आनंद हुभा
चिरी कुकवाची लखलख निरखू
जीव भरंना, भरंना ...
टाकीन ववाळून हिरं मोती सोनं
पिरती मोलाचं कुकवाचं लेनं
चिरी कुकवाची लखलख निरखू
जीव भरंना, भरंना ... | |