|
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला
प्रीती का देई साद ही मजला
दिसे कुणी मज पुन्हा लपते गं, घुमते का शीळ इथे
पदरी मी भास खुळे जपते गं, हलले का पान तिथे
वारा हा काही सांगतो मजला
ओळखीची खूण काही पटते गं, नच झाली भेट जरी
डोळीयांच्या पापण्यात मिटते गं, उमटे जे बिंब उरी
येती या चाहुली कशा मजला | |