हसले आधी कुणी? तू का मी?
सहज तुला मी रे सख्या पाहीले
तू बघता मी गं तुला पाहीले
त्या पाहण्याचे वेड लागता
त्या वेडाचा तू अर्थ सांगता
हसले आधी कुणी? तू का मी?
अवचित तुझी रे भेटची होता
पदर सावरी ढळला नसता
बिजली परी मी निघून जाता
मागे वळूनी तू हळूच पाहता
हसले आधी कुणी? तू का मी? |