कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा चुकिलया माये बाळ हुरुहुरु पाहे जीवनावेगळी मासोळी तैसा तुका तळमळी