Lyrics - Hindi Movie Songs
 Marathi Song Index | Movie | Singer | Musician | Lyricist | Play | Forum | Suggest a Song | Email this Page | Guestbook | Hindi




हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू नवतरुणी काश्मिरी

बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे
हे गवत नव्हे गं पिवळे केशरमळे
हि किमया केवळ घडते प्रीतीमुळे
उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी
दिसशी तू ...

रुसलीस उगा का जवळी ये ना जरा
गा गीत बुलबुला माझ्या चिटपाखरा
हा राग खरा की नखर्‍याचा मोहरा
किती वार मी मरु तुझ्यावर, किती करु शायिरी

हर रंग दाविती, गुलाब गहिरे फिके
तुज दाल सरोवर दिसते का लाडके
पाण्यात तरंगे घरकुलसे होडके
त्यात बैसूनी मधुचंद्राची रात करु साजरी
Lyrics Home | Hindi Lyrics | Marathi Lyrics | Lyrics Forum
copyright © 2000-2006 Manjusha Umesh