ते नयन बोलले काहीतरी, मी खुळी हासले खुळ्यापरी
निळया नभापरी किंचित निळसर
नयन बोलके आणिक सुंदर
बघता बघता मी ही क्षणभर झाले गं बावरी
क्षण माझे मज मलाच न कळे
वसंत नयनी कधी दरवळे
तनू कोमल या वेलीवरले फुल फुले अंतरी
मला हवे जे अती मोहक ते
कसे अचानक जुळूनी येते
सांगाया मज लाज वाटते संभ्रमात क्षणभरी |