|
मी कशाला आरशात पाहू गं ?
मी कशाला बंधनात राहू गं ?
मीच माझ्या रुपाची राणी गं
वारा भारी खटयाळ असा वाहे झुळझुळ
उडवी बटा कशा गं बाई, आवरु तरी कशा
वैरी झोंबे असा अंगा, कशी साहू गं
झाडेवेली जोडीनं बघतात निरखून माझ्याकडे कशा
जीव हो वेडपीसा
वाटे जावे कसे निघूनी, कशी जाऊ गं | |