|
सोनसकाळी सर्जा सजला हसलं हिरवं रान
राघू मैना रानपाखरं गाऊ लागली गान
झुळूझुळू आला पहाटवारा
हळूच जागवी उभ्या शिवारा
झाडंयेली नीज सांडती, नाचनाचतं पान
राघू मैना रानपाखरं गाऊ लागली गान
पिढयापिढयांचं पातक सरलं
शिवनेरीला शिव अवतरलं
शिवरायांच्या मंगल चरणी
पावन झाली अवघी धरनी
जय भवानी बोल गर्जती, आज पाच ही प्राण | |